Skip to main content

Posts

Showing posts from December 14, 2024

" डोममाराजू गुकेश " यशाची गाथा!

'डोममाराजू गूकेश यांची यशाची गाथा' जगामध्ये कित्येक युवा आहेत जे काहीतरी करण्याचा विचार करतात. परंतु त्यांना योग्य तो मार्ग मिळत नाही, आणि मार्ग मिळावा तर त्यांना काहीतरी अडथळा येत असतो किंवा त्यांच्याकडे काहीतरी कारणे असतातच!! पण आत्ताच्या घडीला गुकेश डी एक चांगले उदाहरण आहे. जगातील सगळ्यात तरुण बुद्धिबळपटू म्हणून तो प्रख्यात झाला आहे. असे म्हणतात,"यश हे खूप गोंगाट करते परंतु त्या मागची मेहनत एकदम शांत असते "जी कुणालाही दिसत नाही. आपल्याला प्रत्येकांचं यश बघून काहीतरी वेगळं करावं वाटते, नाहीतर आपल्याकडे खूप कारण असतात,की नशिबाने आपल्याला साथ दिली नाही,आणि मला साथ देणारे कोनी नाही. जगामध्ये कितीतरी उदाहरणे आहेत जे शून्यातून विश्व निर्माण करतात आणि जगभर, विश्वभर स्वतःची प्रसिद्धी प्रख्यात करतात, त्याचेच एक उदाहरण म्हणजे गुकेश डी. जो सध्या जगातल्या पाच बुद्धिबळ पटून पैकी एक आहे. आणि सर्वात लहान किंवा कमी वयाचा बुद्धिबळ पट्टू आहे. आपण त्याच्या विषयी जाणून घेऊया किंवा त्याच्या यशाची गाथा समजून घेऊया!! आपला भारत देश खूप मोठा असून त्यामध्ये खूप सारे राज्य आहेत, पण कधी आप...