'डोममाराजू गूकेश यांची यशाची गाथा'
जगामध्ये कित्येक युवा आहेत जे काहीतरी करण्याचा विचार करतात. परंतु त्यांना योग्य तो मार्ग मिळत नाही, आणि मार्ग मिळावा तर त्यांना काहीतरी अडथळा येत असतो किंवा त्यांच्याकडे काहीतरी कारणे असतातच!! पण आत्ताच्या घडीला गुकेश डी एक चांगले उदाहरण आहे. जगातील सगळ्यात तरुण बुद्धिबळपटू म्हणून तो प्रख्यात झाला आहे. असे म्हणतात,"यश हे खूप गोंगाट करते परंतु त्या मागची मेहनत एकदम शांत असते "जी कुणालाही दिसत नाही. आपल्याला प्रत्येकांचं यश बघून काहीतरी वेगळं करावं वाटते, नाहीतर आपल्याकडे खूप कारण असतात,की नशिबाने आपल्याला साथ दिली नाही,आणि मला साथ देणारे कोनी नाही. जगामध्ये कितीतरी उदाहरणे आहेत जे शून्यातून विश्व निर्माण करतात आणि जगभर, विश्वभर स्वतःची प्रसिद्धी प्रख्यात करतात, त्याचेच एक उदाहरण म्हणजे गुकेश डी. जो सध्या जगातल्या पाच बुद्धिबळ पटून पैकी एक आहे. आणि सर्वात लहान किंवा कमी वयाचा बुद्धिबळ पट्टू आहे. आपण त्याच्या विषयी जाणून घेऊया किंवा त्याच्या यशाची गाथा समजून घेऊया!!
आपला भारत देश खूप मोठा असून त्यामध्ये खूप सारे राज्य आहेत, पण कधी आपण विचार केला आहे का? महाराष्ट्र व्यतिरिक्त साउथ इंडियन ,नॉर्थ इंडिया प्रत्येक राज्यांमध्ये कितीतरी विद्वान लोक आपल्याला बघायला मिळतात त्या मागचे कारण काय? किंवा जास्त यश मिळणारे सध्याच्या घडीला तेच लोक आहेत. मला कोणाचे मन दुखवायचे नाहीये पण मी सत्य दाखवत आहे,कारण जगामध्ये सर्व विद्वान शास्त्रज्ञ चेन्नई तामिळनाडू तेलंगणा,आंध्र प्रदेश ,केरला या राज्यातील बघायला मिळतात. त्यांच्या कडे संपत्ती ,समृद्धी असली तरी ते शिक्षणाला महत्त्व देतात. आपल्या मुलांना योग्य ते संस्कार योग्य ती शिकवण देतात. त्यांना लहानपणापासूनच योग्य त्या मार्गी लावतात. आपण मात्र बघू शकतो की त्या ,त्या राज्यांव्यतिरिक्त कुठल्याही राज्यांमध्ये बघा ,आई-वडिलांना त्यांच्या मूलाच्या भविष्यसाठी घेणेदेणे नसते, ते बिनधास्त मोबाईल मुलांच्या हाती देतात आणि ते मोकळे होतात आणि त्यांना त्यांचे कार्य किंवा जबाबदारी संपल्यासारखे वाटते. किंवा त्यांच्या मनामध्ये असते की आम्ही जसे वाढलो आम्ही जसे आमच्या मार्गी लागलो तशी मुलं पण लागतील. पण आपण जर छोट्या आर्टिकल मधून वाचून माहिती काढली तर आपल्या लगेच लक्षात येईल जे कोणी आई-वडिलांचा किंवा नातेवाईकांचा किंवा थोरामोठ्यांचा थोडासा तरी पाठिंबा असतो.
डोमराजू गूकेश म्हणजेच, गुकेश डी जो चेन्नई या शहरांमध्ये 26 मे 2006 ला एका सुशिक्षित घराण्यामध्ये जन्मला. त्यांचे वडील एक ऑर्थोपेडिस म्हणजे हाडांचे डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे ती पण सुशिक्षित आहे. मुलांना लहानपणापासूनच योग्य ते मार्गदर्शन करून मुलांना लहानपणापासूनच योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना योग्य त्या मार्गावर लावून त्यांच्या आवडीनुसार त्यांना मार्गी लावले. गुकेश आणि त्याची बहीण अलीसिया आणि भाऊ डेवोन. तिघेही स्पोर्ट बॅकग्राऊंड मध्ये आहेत. बहिण अलेशिया वर्ल्ड बॉक्सिंग मध्ये चॅम्पियन आहे तर भाऊ डेवोन हा फॉर्मल वर्ल्ड किक बॉक्समध्ये चॅम्पियन आहे आणि गूकेश जगातला सर्वात लहान बुद्धिबळपटू आहे जो जगात पाचव्या क्रमांकावर येतो. गुकेशची वडील डॉक्टर राजन यांनी पण खूप मोठमोठे स्वप्न बघायला हवी होती, जसे की त्यांची मुलं ही डॉक्टर ,इंजिनियर, कलेक्टर, बनण्याची त्यांची इच्छा असायलाहवी बनण्याची त्यांची इच्छा असायला हवी होती. पण नाही त्यांनी आपल्या मुलांना कुठली बळजबरी केली नाही किंवा त्यांना कुठल्या गोष्टीसाठी बळजबरी करून पुढे ढकलले नाही. त्यांनी आपल्या मुलांच्या आवडी कडे लक्ष दिले आणि त्यानुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना जगामध्ये सुप्रसिद्ध केले, एवढेच नाही तर आपल्या देशाचे नाव सन्मानाने वाढवले! यश हे वाटते तेवढी सोपे नाही किंवा बोलल्याने होत नाही किंवा बोललं नाही करता येत नाही, हेच लोकेशन आता सिद्ध केले आहे पण मात्र आपण जर चिकाटी आणि जिद्द ठेवली तर यश आपल्यापासून दूर जात नाही हे नक्की!! भूकेशने त्याचे प्राथमिक शिक्षण जरी खाजगी शाळेमधून पूर्ण केले असले तरी, त्याची जी कौशल्य होती ती त्यांच्या आई-वडिलांनी ओळखली होती. आणि बुद्धिबळाच्या कौशल्यामुळे त्याचे अकादमीक शिक्षण बाजूला ठेवून बुद्धिबळाकडे लक्ष दिले. त्याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. आणि पुढे बारा वर्षे सात महिने आणि 17 दिवस वय असताना ग्रँडमास्टर चा किताब मिळवला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याने कधी समाधान मानले नाही किंवा हार मानली नाही. आणि आज तो जगातला दुसऱ्या नंबरचा बुद्धिबळपटू आहे. खरंच भारत देशासाठी आणि त्याच्या राज्यासाठी गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये असलेला जिद्दीने मेहनतीने चिकाटीने खूप सारे रेकॉर्ड बनवलेत.
१) वर्ष 2022: चेस ओलिंपियाड 2022 मध्ये त्यांने सुवर्णपदक मिळवून दिले.
२) वर्ष 2023: त्याने विश्व बुद्धिबळ स्पर्धेत टॉप करून, टॉप 20 च्या यादीमध्ये प्रवेश घेतला.
३) वर्ष 202४: जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ पठान बुद्धिबळ पटून पैकी एक मानला जातो.
खूप लक्ष केंद्रित करून खेळला जाणारी स्पर्धा म्हणजे बुद्धिबळ. जसे क्रिकेटमध्ये शतक मोजली जातात तसेच फिडे रेटिंग्स दिल्या जाते. त्यामध्येही त्याला 2700 प्लस रेटिंग आहे म्हणजेच तो सुपर ग्रँडमास्टरच्या श्रेणीमध्ये मोडतो.
या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईलच की त्याचा जो पाया होता खूप मजबूत होता आणि त्याने आवड निर्माण केली होती. त्याने सर्व कारणे साईडला ठेवली होती.
सतत प्रयत्नशील राहून सतत खेळू सतत लक्ष केंद्रित करून तो चांगल्या प्रकारे तल्लक झाला होता. कोणती गोष्ट सतत केल्याने ती एकदम सोपी होते. त्याचप्रमाणे गुपेशनेही स्वतःला बुद्धिबळामध्ये अतिशय वेगवान आणि चपळ विचार करणारा बनवले, त्याच्या आक्रमक शैलीमुळे तो विरोधकांना नेहमी त्याच्या हा दबावाखाली ठेवतो. तसेच आपण पण शिकण्यासारखे आहे की आपल्या आजूबाजूला कितीही विरोधक असले तर आपण त्यांना दबावाखाली ठेवायला पाहिजेत.
त्याने विश्वनाथ आनंद जे सतत पाच वेळा ग्रँडमास्टर बनले त्यांना आपल्या गुरुस्थानी ठेवून सतत प्रयत्न करून हे स्थान मिळवले. त्यांना आदर्श स्थानी ठेवून त्यांच्याकडून प्रेरना घेतली. गूकेश ला खूप काही छंद नाहीयेत त्याला फक्त वाचन आवडते आणि संगीत ऐकायलाही आवडते, तसेच आपल्या आई-वडिलांसोबत किंवा कुटुंबासमवेत वेळ घालवायलाही आवडते गप्पा मारायला ही आवडतात.
असा हा गुकेश डी, जो भारत देशाचा बुद्धिबळाचा भविष्यकाळ मानल जातो. त्याच्या चिकाटीने, जिद्दीने ,मेहनतीने तो भारत देशाचे जगामध्ये नाव उंचावत आहे. अशा सुपुत्राचे आपण उदाहरण समोर ठेवून आयुष्यामध्ये काहीतरी घडून असा की सज्ज असायला पाहिजेत. आपण कधीही आशा सोडली नाही पाहिजेत. आपले गुण कौशल्य ओळखून त्यावर प्रयत्नशील राहून यशस्वी बनता येते हे दाखवून दिले आहे.
@GUKESHD #WORLD YOUNGEST CHESS CHAMPION
Story of moral: > नमस्कार मित्रांनो, हा लेख वाचुन तुम्हाला कदाचित तूमचा करूणाभाव जागृत होईल, हाच माझा एकमेव उद्देश आहे, नकळत जर या लेखात तुम्हाला काही त्रूटी आढळली किंवा काही नविन शिकायला मिळाले , तर कृपा करून कमेट मध्ये कळवा.धन्यवाद ! तर शेवट पर्यंत नक्की वाचा लाचार, भूकेला,भटका , थंडी ,ऊन , वारापावसात दररोज असह्य वेदना सोसणार्या श्वानाविषयी बोलाव तेवढ कमीच आहे. श्वान हा मासांहारी जीव असुन सुध्दा नकळत तो शाकाहारी बनलेला दिसतो. श्वानाम्ध्ये बरेच चांगले गुण लाभलेले आहेत, ते माणसाने अगिंकारले तरी माणसाला आयुष्य जगायला मदत करतिल.श्वान हे फक्त आवश्यक तितकेच किंवा त्याला जमेल त्या पेक्षा अधिक काम करतो, तसेच मिळेल त्या आहारातुन स्वत;ला तृप्त करतो.ते कितीही गाढ झोपैत असु द्या तो सावधान / जागृत असतो.तो खुप दुरवरून शत्रुची हालचाल समझुन घेऊन त्वरित सावध होतो. तसेच श्वानाचा एक नैसर्गिक गुण म्हणजे त्याचा प्रामाणिकणपणा . जर का तुम्ही एकदाची त्याला माया लावली तर तुमच्या साठी स्वत: चा जीव सुध्दा ओवाळुन टाकतो , म्हणजेच तो एक शौर्यवान प्राणी आहे. अश्या या श्वानाविषयी आपल्याला प्रेम का नाही? ...
टिप्पण्या