Story of moral:
>
नमस्कार मित्रांनो, हा लेख वाचुन तुम्हाला कदाचित तूमचा करूणाभाव जागृत होईल,
हाच माझा एकमेव उद्देश आहे, नकळत जर या लेखात तुम्हाला काही त्रूटी आढळली किंवा
काही नविन शिकायला मिळाले , तर कृपा करून कमेट मध्ये कळवा.धन्यवाद ! तर शेवट पर्यंत
नक्की वाचा लाचार, भूकेला,भटका , थंडी ,ऊन , वारापावसात दररोज असह्य वेदना
सोसणार्या श्वानाविषयी बोलाव तेवढ कमीच आहे. श्वान हा मासांहारी जीव असुन सुध्दा
नकळत तो शाकाहारी बनलेला दिसतो. श्वानाम्ध्ये बरेच चांगले गुण लाभलेले आहेत, ते
माणसाने अगिंकारले तरी माणसाला आयुष्य जगायला मदत करतिल.श्वान हे फक्त आवश्यक
तितकेच किंवा त्याला जमेल त्या पेक्षा अधिक काम करतो, तसेच मिळेल त्या आहारातुन
स्वत;ला तृप्त करतो.ते कितीही गाढ झोपैत असु द्या तो सावधान / जागृत असतो.तो खुप
दुरवरून शत्रुची हालचाल समझुन घेऊन त्वरित सावध होतो. तसेच श्वानाचा एक नैसर्गिक
गुण म्हणजे त्याचा प्रामाणिकणपणा . जर का तुम्ही एकदाची त्याला माया लावली तर
तुमच्या साठी स्वत: चा जीव सुध्दा ओवाळुन टाकतो , म्हणजेच तो एक शौर्यवान प्राणी
आहे. अश्या या श्वानाविषयी आपल्याला प्रेम का नाही? हल्ली गावांगावांमध्ये भटकी
कुत्री संपुर्ण गावाचे अप्रत्यक्षपणे रक्षण करतात.पण हिच ती श्वान कधी जखम झालेल्या
अवस्थेमध्ये तर कधी रस्त्यावर झालेल्या अपघातात अर्धमेल्या अवस्थेत पाहायला मिळतात.
एवढच नव्हे तर काही समाजकठंक यांच्यावर धारदार हत्याराने पण वार करतात. त्यांची
चुकी काय तर बिचारे पोटासाठी त्यांच्या दारामध्ये येऊन उभे राहतात. माणसांची दया
यांच्यावर का दिसत नाही? मान्य आहे श्वान हा काही चुका करू शकतो जसे कि, भीतीपोटी
किंवा काही कारणास्तव चावा घेतात , तर कधी पोटाच्या आकांताने किंवा गरजेपोटी
तुमच्या घरात प्रवेश करु शकतात, यात त्यांची कसली चुक? एक छोटीसी गोष्ट. फार
वर्षीपूर्वी लोक पायी चालत गावोगावी जात व्यापार करायला आण त्यांच्या सोबतीला पाळीव
प्राणी सतत असायचे त्यामध्ये एक कुत्रा आणि दुसरे गाढव. असाच एक व्यापारी आपल्या
गाढव आणि लाडक्या मोती कुत्रा सोबतीला घेऊन दुसर्या गावी जात होता. ते ऊन्हाळ्याचे
दिवस होते.चालत चालत व्यापारी दुपारच्या वेळेस थकला व आजूबाजूला विश्रांती साठी
डेरेदार झाड बघुन तिथेच थांबला, ऐरवी तो जेवण करायच्या आधि गाढवाला आणि मोत्याला
खाऊ घालुन एक-दोन तास विश्रांती घ्यायचा आणी गाढवाला व मोत्याला मोकळे ठेवाचा. पण
आज जास्त थकल्यामुळे तो तसाच झोपी गेला.गाढव आणि मोती उपाशीच होते. दोघेही
व्यापार्याचंया आजुबाजुला बसले होते,आणि थोड्या वेळात एक जहरीला साप गाढवाच्या
अंगावर पडतो , तसे तो ताड्कण ऊठतो व अंग झटकु न दुसर्या जागी बसतो.तो साप तसाच
मोत्या पायावरुन सरळ व्यापार्यच्या अंगावर जाणार तसाच मोत्यने तयाला अलगत बाजुला
फेकले व त्या सापावर हल्ला , करुन सापाला दाताने फाडून रक्ता बांबळ केले व तो साप
जागीच ठार झाला. अशा प्रकारे मोत्याने सापाला ठार करून व्यापार्याचे प्राण वाचिवले.
नंतर त्याने गाढवाला विचारले की साप बघून सुद्धा मला का सांगितले नाही? त्यावर
गाढवं बोलले आज मालकाने मला खायायला नाही दिले ,आणी तुला पण काही खायायला नाही
दिले.मग आपण का त्याचा जीव वाचवायचा? आणी तसाही तो आता म्हातारा झाला.तु त्याला का
वाचिवले? वाचिवले? गाढवाचे शब्द एकूण मोत्या एकदम शांत झाला व स्वतः ला सावरून
गाढवाला बोलला की त्याने आपली लहानपणापासून सेवा केली आणी सदैव आपल्या सोबत असतो,
आज जास्त थकल्यामुळे तो आपल्याला खायायला घालायला विसरला असेल, तो जरी विसरला असेल
पण तो जागी झाल्यावर खायायला टाकणार. तो जरी एका दिवसाठी किंवा एका वेळेसाठी त्याचे
कर्तव्य विसरला पण आपण आपले कर्तव्य विसरून त्याला आयुष्यातून संपवने हे कुठले
मोठेपण?
गाढवं त्याला हसून म्हणाले, मोठा आला मला कर्तव्य शिकवायला काम तर काही करत
नाही फक्त मालकाच्या मागे मागे भटकत असतो नेहमी. गाढवाचे हे शब्द मोत्याला सहन झाले
नाहीत ,त्यामुळे तो थोडा दूरवर जाऊन दुःख व्यक्त करून रडत होता. मालक गाढ झोपेत
आहे, आणि त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला साप पाहून गाढवाला एक युक्ती सुचली. तो
त्या मलेल्या सापाला आपल्या पायाखाली घेऊन बसला जेणेकरून मालक झोपेतून उठल्यावर
त्याला शाबासकी देईल व त्याला हिरवा चारा देईल.गाढवाने जसा विचार केला तसेच झाले
व्यापारी झोपेतून उठे पर्यंत मोती तिथे आला नव्हता. व्यापाऱ्यला वाटले की हा विषारी
सर्प गाढवाने मारून ठार केला आणि माझा लाडका मोती खायच्या शोधात कुठे तरी गेला
असावा;असा विचार करून व्यापाऱ्याने गाढवाला मिठी मारली त्याला धन्यवाद देऊन त्याचे
कौतुक करून त्याला पोटभर खायायला घातले.थोड्या वेळात मोती तिथे आला,तसा
व्यापाऱ्याने त्याला एक फटका दिला आणि आज तुला काही खायायला मिळणार नाही ही
शिक्षाही दिली. बिचारा मोती ; मालकाने एवढे करून पण मालकाला लाड घालत होता आणि गाढव
त्याला बघुन असत होते. असे हे श्वान आतिशय उदार आणि निर्भीड आहे!! मला खात्री आहे
की, तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल, कृपया नक्की कंमेंट करा व आपल्या मित्र
परिवारासोबत शेअर करा.धन्यवाद!!
टिप्पण्या